Friday, February 27, 2026
Homeब्रेकिंगIAS पूजा सिंघल यांना ईडीकडून अटक, पती अभिषेक यांना बेड्या

IAS पूजा सिंघल यांना ईडीकडून अटक, पती अभिषेक यांना बेड्या

ताजी बातमी ऑनलाईन टीम

अंमलबजावणी संचलनालयाच्या विविध पथकांकडून अवैध खाणकाम आणि बेनामी कंपन्यांप्रकरणी विविध ठिकाणी ६ मे रोजी छापे टाकण्यात आले होते. ईडीनं शुक्रवारी आयएएस अधिकारी आणि झारखंडच्या खाणकाम आणि उद्योग विभागाच्या सचिव पूजा सिंघल यांच्या सरकारी निवासस्थानासह, पतीच्या घरी आणि त्यांच्याशी संबंधित ठिकाणी छापे टाकले होते. ईडीनं आज पूजा सिंघल आणि त्यांचे पती अभिषेक झा यांना अटक केली आहे. पूजा सिंघल यांना ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. पूजा सिंघल या २००० च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.

आयएएस पूजा सिंघल यांचे पती अभिषेक झा यांना देखील ईडीनं अटक केली आहे. अभिषेक यांची आज सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. पूजा सिंघल आणि अभिषेक झा यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. ईडीनं अभिषेक झा यांच्या पल्स हॉस्पिटलवर देखील छापे टाकले होते. ईडीनं पल्स हॉस्पिटलमध्ये आलेली गुंतवणूक कुठून आली, असा प्रश्न विचारल होता. ईडीनं हॉस्पिटलमध्ये १२३ कोटींची गुंतवणूक झाल्याचं दिसत असून तुम्ही २३ कोटीचा उल्लेख कसा करता, असा सवाल अभिषेक झा यांना केला आहे.

२० ठिकाणी छापे १९.३९ कोटी जप्त

ईडीनं पूजा सिंघल यांच्याशी संबंधित सीएच्या घरातून १९.३१ कोटी रुपये जप्त केले होते. ईडीनं मुंबई, दिल्ली, जयपूर आणि रांचीमध्ये छापे टाकले. ईडीला जप्त केलेली रोख रक्कम ताब्यात घेण्यासाठी बस बोलवाली लागली होती होती.ईडीनं पूजा सिंघल यांचे सासरे कामेश्वर झा यांना अटक केली होती. मधुबनी येथील निवासस्थानातून त्यांना अटक करण्यात आली. ईडीकडून या प्रकरणी अनेक ठिकाणी छापे मारण्यात आले. झारखंड, बिहार, राजस्थान, हरियाणा, नवी दिल्ली आणि महाराष्ट्रातील मुंबईमध्ये ईडीनं एकाच वेळी छापे टाकले होते. रांचीमधील पंचवटी रेसिडेन्सी, ब्लॉक नंबर ९, चांदणी चौकातील हरिओम टॉवर, नवी बिल्डींग, लालपूर, पल्स हॉस्पिटल बरियातू आणि पूजा सिंघल यांच्या सरकारी निवासस्थानी ईडीनं छापे टाकले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -