Saturday, July 5, 2025
Homeब्रेकिंगUddhav Thackeray : मुख्यमंत्री ठाकरे मुंबईनंतर संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेणार

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री ठाकरे मुंबईनंतर संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेणार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज जाहीर सभा होत आहे. मुंबईतील बीकेसी मैदानावर सायंकाळी ७ वाजता ही सभा सुरू होईल. या सभेत उद्धव ठाकरे विरोधकांवर आक्रमकपणे निशाणा साधणार यात शंका नाही. मात्र, या सभेपूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. आजच्या मुंबईतील सभेनंतर उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे समजते आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतल्या सभेनंतर संपुर्ण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे जाणार आहेत. उद्धव ठाकरे शेतकरी, कष्टकरी आणि शिवसैनिकांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपुर्ण महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. महाराष्ट्रात विभागवार सभा आखण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्रातल्या सर्व विभागात जाणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -