Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगलग्नाच्या जेवणातून विषबाधा, 100 पेक्षा जास्त जणांवर उपचार सुरु!

लग्नाच्या जेवणातून विषबाधा, 100 पेक्षा जास्त जणांवर उपचार सुरु!


परभणीमध्ये विषबाधाची मोठी घटना समोर आली आहे. लग्नाच्या (Wedding) जेवणातून विषबाधा (poisoning case) झाली आहे. परभणी शहरातील दर्गा रोड परिसरात ही घटना घडली आहे. 100 पेक्षा अधिक नागरिकांना विषबाधा झाली असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये (Hospital) उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परभणीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

परभणी शहरातील दर्गा रोड परिसरात एक लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यात जेवण झाल्यानंतर काही तासांमध्येच लग्नाला आलेल्या 100 पेक्षा अधिक नागरिकांना उलट्या, मळमळ आणि चक्कर येण्याचा त्रास सुरु झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. नजीकच्या डॉक्टरांना बोलावण्यात आले. पण अचानक रुग्णसंख्या वाढत गेली. खूप जणांना त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना तात्काळ परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सर्वांवर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. रुग्णालय प्रशासन यासंदर्भात सतर्क असून रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान, ही विषबाधा जेवणातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पण ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली? का कोणी मुद्दाम हे कृत्य केले किंवा शिळा भाजीपाला वापरला गेल्यामुळे ही विषबाधा झाली. यासर्व बाजूने पोलिसांकडून तपास सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -