Saturday, July 5, 2025
HomeसांगलीSangli : भिलवडीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत

Sangli : भिलवडीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पलूस तालुक्यातील खटाव व भिलवडी गावाला भेट दिली. त्यांनी गावातील प्रमुख नेते, कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या सोबत सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम उपस्थित होते, भिलवडीत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भिलवडी गावाचे महापुरापासून संरक्षण होण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री व पूरसंरक्षण भिंत बांधण्यात यावा, अशी मागणी भिलवडी ग्रामपंचायत व भिलवडी काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आली.

 

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, भिलवडीचे काँग्रेसचे नेते संग्राम पाटील, वसंतदादा पाटील कारखान्याचे संचालक राजू पाटील, भिलवडीच्या सरपंच विद्या पाटील, उपसरपंच पृथ्वीराज पाटील, मनोज गरव, स्वप्नाली रांजणे, सीमा शेटे, शहाजी गुरव, बाबासाहेब मोहिते, । चंद्रकांत पाटील, बाळासाहेब मोहिते, बाळासाहेब मोरे, विजय पाटील उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -