Sunday, February 22, 2026
Homeसांगलीसांगली : कॅनॉलवरील पाण्याच्या मोटारी चोरी करणाऱ्यास अटक

सांगली : कॅनॉलवरील पाण्याच्या मोटारी चोरी करणाऱ्यास अटक

मिरज / प्रतिनिधी
येळावी येथील कॅनॉल वरील पाण्याच्या मोटारी चोरी करणारास अटक करून पोलिसांनी सात इलेक्ट्रीक मोटारी जप्त केल्या आहेत . याबाबत अधिक माहिती अशी की येळावी परिसरातील कॅनॉल वरील व शेतातील पाण्याचा इलेक्ट्रिक मोटर चोरीस गेल्याची फिर्याद तासगाव पोलिसात दाखल झाली होतो , त्या अनुषंगाने तपास करीत असता पोलिसांनी आरोपी प्रमोद शिवाजी पाटील, वय 23 वर्षे ,राहणार येळावी तालुका तासगाव यास अटक करून त्यांच्याकडून 80 हजार रुपये किमतीच्या सात इलेक्ट्रिक मोटर जप्त केल्या आहेत , तसेच सदर आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे .

सदरची कारवाई तासगावच्या पोलिस उपाधीक्षक अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे , पोलीस उपनिरीक्षक नामदेव तारडे , पोलीस नाईक सागर लवटे , सोमनाथ गुंडे , श्रीकांत अभंगे अमोल चव्हाण, गणेश जाधव , पोलीस अमलदार सतीश खोत , विनोद सकटे , दत्तात्रय जाधव , समीर आवळे यांच्या पथकाने सदरचा गुन्हा उघडकीस आणला.पुढील तपास तासगाव पोलिस ठाण्याचे पोलीस नाईक श्रीकांत अभंगे हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -