Monday, February 23, 2026
Homeसांगलीसांगली : एअर बॅग उघडल्याने कारचा भीषण अपघात

सांगली : एअर बॅग उघडल्याने कारचा भीषण अपघात

टाकळी (ता. मिरज) येथे मिरज-सलगरे राज्यमार्गावर दोन कारमध्ये भीषण अपघात झाला. अपघातामुळे दोन्ही गाड्यांचे एअरबॅग उघडल्याने सहाजणांचे प्राण वाचले. मात्र, एका कारमधील तिघेजण जखमीझाले आहेत. त्यांच्यावर मिरजेत खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. मिरजेतील लग्नकार्य आटोपून (एम.एच. ११, सी.क्यू. ९७७०) ही कार टाकळीमार्गे तासगावकडे निघाली होती. त्याचवेळी सुभाषनगरकडून म्हैसाळच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या (एम.एच. १२, के. वाय. ५८११) या कारची जोरदार धडक बसली. त्यामुळे तासगावकडे निघालेली कार उलटी फिरून एका टपरीमध्ये घुसली.

सुदैवाने टपरी चालक काही वेळापूर्वीच टपरीतून बाहेर गेल्याने तो बचावला. कर्नाटक पोलिसांचा मिरजेत छापा? मिरज : घटप्रभा (कर्नाटक) येथे क्रिकेट बेटिंग सट्टाबाजारप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी मिरजेत तीन ठिकाणी छापे टाकल्याची चर्चा आहे. यावेळी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून एका बुकीने पलायन केल्याचे सांगण्यात आले. या किकेट बेटिंग प्रकरणात कर्नाटकात गन्हा दाखल करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -