गॅरेजमध्ये आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याबद्दल रफी महंमद शेख (वय २५, सांगली) याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती डी. एम. भंडे यांनी सहा महिन्याच्या सक्तमजुरीची शिक्षा सनावली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता इम्रान मुजावर यांनी काम पाहिले. आरोपी रफी शेख याचे अंकली येथे गॅरेज आहे.
दि. १६ मार्च २०१३ रोजी पीडित महिला कार बंद पडल्याने दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये गेली होती. गाडीची दुरुस्ती झाल्यानंतर गाडी नीट चालते का, हे पाहण्यासाठी शेख हा चाचणी घेत होता. त्यावेळी पीडित महिला बाजूच्या सीटवर बसली होती. त्यावेळी आरोपीने शेख याने तिचा विनयभंग केला. त्यानंतर महिलेने शहर पोलिसांत फिर्याद दिली. पोलिस उपनिरिक्षक एस. पी. चव्हाण यांनी पोलिस अंमलदार महेश बने आणि सीमा धनवडे यांच्या सहकायनि या प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध खटला दाखल केला होता.





