Monday, February 23, 2026
Homeमहाराष्ट्रअखेर पितापुत्राच्या मृत्यूचा उलगडा; वाचून धक्का बसेल

अखेर पितापुत्राच्या मृत्यूचा उलगडा; वाचून धक्का बसेल

नाशिक  पंचवटी परिसरात दोन दिवसांपूर्वी राहत्या घरात पिता-पुत्राचे मृतदेह आढळले होते. यात पित्याने गळफास घेतल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, मुलाच्या मृत्यूबाबत गूढ होते. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी केलेल्या चौकशीत मुलाच्या हट्टी स्वभावाला कंटाळून वैफल्यग्रस्त झालेल्या पित्यानेच त्याचा झोपेत गळा आवळून खून केल्याचा उलगडा झाला आहे.

सीतागुंफा येथील रेवास्वामी सोसायटीत गुरुवारी (दि. 19) सकाळी सातच्या सुमारास जगदीश पुंडलिक जाधव (48) यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. तसेच त्यांचा मुलगा प्रणव जगदीश जाधव (17) यांचाही मृत्यू झालेला होता. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रतीक पाटील यांच्याकडे होता.

दोन्ही मृतदेहांवर गुरुवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, शुक्रवारी त्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये जगदीश जाधव यांचा गळफासाने मृत्यू झाल्याचे, तर प्रणव जाधव याचा गळा आवळून मृत्यू झाल्याचे अहवालातून निष्पन्न झाले. या अहवालाच्या अनुषंगाने आणि जगदीश यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी मृत जगदीश जाधव यांच्या विरोधात मुलाच्या खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (प्रशासन) रणजित नलवडे हे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -