ताजी बातमी ऑनलाईन टीम
शिराळा : खोतवाडी (ता. शाहूवाडी ) येथील मांडलाई पठार परिसरात पिसोरा (गेळा ) व सशांची शिकार करणाऱ्या पाच जणांना वनविभागाच्या पथकाने पकडले. त्यांच्याबरोबर असलेले दोघेजण फरारी झाले आहेत. त्यांच्याकडे शिकार केलेल्या दोन पिसोरा, दोन ससे , बंदुका, काडतुसे मिळाली आहेत.
प्रवीण विश्वास बोरगे (29), बाजीराव बाबू बोरगे (45), मारुती पांडुरंग वरे (30), संजय हिंदूराव भोसले (33), रामचंद्र बाबू बोरगे (32) (सर्व रा. वरेवाडी, ता. शाहूवाडी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तर आबाजी बाजीराव बोरगे व अमोल शिवाजी रवंदे हे दोघे फरार झाले आहेत. अटकेतील पाचही संशयितांना येथील प्रथमवर्ग न्यायालयाने सोमवार (दि. 30) पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे, अशी माहिती मलकापूर परिक्षेत्र अधिकारी अमित भोसले यांनी दिली. मांडलाई पठार परिसरात गुरुवारी (दि.26) रात्री काहीजण शिकारीसाठी गेले होते. वनविभागाच्या पथकाने मांडलाई पठारावर खोतवाडी ते कुंभारवाडी दरम्यान रात्री दहापासून पाळत सुरू केली. त्यावेळी या परिसरातील हुलवाणी नावाच्या ठिकाणी रात्री बाराच्या सुमारास गोळीबार झाल्याचा आवाज आला.