ताजी बातमी ऑनलाईन टीम
केंद्र सरकारने यूट्यूब आणि ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला मोठा आदेश जारी केला आहे. महिलांवरील लैंगिक हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या परफ्यूम बँडचे व्हिडिओ आपपल्या सोशल प्लॅटफॉर्मवरून काढून टाका, असे केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितले आहे. या आदेशाचे एक परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. पीआयबीने आपल्या ट्विटर अकौंटवरून ही माहिती दिली आहे.
पीआयबीच्या ट्विटमध्ये आहे की, हे व्हिडिओ सभ्यता आणि नैतिकतेच्या हितासाठी महिलांच्या चित्रणासाठी हानिकारक आहे आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहितेचे उल्लंघन आहे. जाहिरातीमुळे मोठा असंतोष परफ्यूम बँडच्या व्हिडिओने सोशल मीडिया युझर्सच्या मोठ्या वर्गामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ही जाहिरात महिलांवरील लैंगिक हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी असल्याचे सांगण्यात येत आहे.
एका अधिकृत प्रवक्त्याने सांगितले की, ‘माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या लक्षात आले आहे की सोशल मीडियावर परफ्यूमची अयोग्य आणि अपमानास्पद जाहिरात प्रसारित केली जात आहे. मंत्रालयाने ट्विटर आणि यूट्यूबला या जाहिरातीचे सर्व व्हिडिओ त्वरित काढून टाकण्यास सांगितले आहे.’





