Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगयंदाची आषाढीवारी कोरोना निर्बंधमुक्त असणार

यंदाची आषाढीवारी कोरोना निर्बंधमुक्त असणार

देशात गेल्या काही दिवसात कोरोना वाढायला लागला आहे. राज्यावरही कोरोनाच्या चौथ्या लाटेची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संदर्भात मंत्री मंडळाच्या बैठकीत आषाढीवारी दिंडीच्या बाबतीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी कोनाकोपऱ्यातून भाविक पंढरपूरला येतात त्यात गेल्या दोन वर्षापासून कोरोना निबंधामुळे हिरमोड व्हायचा आता मात्र या वर्षी कसलेही निर्बंध नसल्यामुळे यंदा आषाढीवारीत लाखो वारकरी सहभागी होणार आहेत.

मंत्री मंडळाच्या बैठकीत दिंडीच्या बाबतीत चर्चा झाली. दिंडीत 10-15 लाख भाविक येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे टोपे म्हणाले. यावर्षी होणाऱ्या आषाढी वारीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे आता वारीवर कोणतेही निर्बंध घालता येणार नाहीत, असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -