Sunday, February 22, 2026
Homeमहाराष्ट्रवाहनांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक

वाहनांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक

सातारा शहरात एम. आय. डी. सी व इतर ठिकाणी वाहनांच्या बॅटरी चोरीचे प्रमाण वाढल्याने सातारा शहर पोलिस या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करीत होते. अशावेळी डी. बी. पोलिसाचे पथक पेट्रोलिंग करीत असताना एक युवक संशयितरित्या आढळून आला. त्याच्याकडे चोरलेल्या एकूण 9 बॅटऱ्या व चोरीकरिता वापरलेली मोटारसायकल असा एकूण 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. या प्रकरणात सुनील सुखदेव वाघमारे (वय-23, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील एम. आय. डी. सी. परिसर तसेच इतर ठिकाणी वाहनांचे बॅटरी चोरीचे प्रकार घडत असल्याने पोलीस सदर चोरटयांचा शोध घेत होते. पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बॅटरी चोरी करणारे युवकांची माहिती मिळाली होती. त्याअनुशंघाने डी. बी. पथकातील पोलीस स्टाफ त्याचा शोध घेत होते. सातारा एम. आय. डी. सी. परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना एक संशयित युवक मिळून आल्याने त्याचेकडे चौकशी केली असता, त्याने त्याचे अन्य एका साथीदारासमवेत बॅटऱ्या चोरी केलेचे सांगितले. त्याबाबत त्याचेकडे अधिक कौश्यल्यपूर्वक चौकशी केली असता त्याने एकत्रित मिळून चोरलेल्या एकूण 9 बॅटया व चोरीकरिता वापरलेली मोटारसायकल असा एकूण 1लाख 10 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजय बो-हाडे, सहा. पोलीस अधिक्षक आँचल दलाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, मपोनि. वंदना श्रीसुंदर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो. ना. सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, पो.ना. विक्रम माने, पो. कॉ. संतोष कचरे, गणेश घाडगे, गणेश भोंग, सागर गायकवाड, दिपक गुरव, दिपक इंगवले, अरूण दगडे यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -