केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना अग्नीपथची घोषणा झाल्यापासून योजना अडचणीच्या भोवऱ्यात सापडली आहे. आठ ते नऊ राज्यांमध्ये या योजनेला विरोध करण्यासाठी तरुण पुढे सरसावले आहेत. तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी मात्र कोणत्याही परिस्थिमध्ये योजना मागे घेतली जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. लष्कराने अग्निशमन दलाच्या भरतीची (Recruitment) प्रक्रिया सुरू करण्याची देखील घोषणा केली आहे. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली आहे.
अग्निपथच्या पहिल्या बॅचची नोंदणी प्रक्रिया याच महिन्यात म्हणजेच 24 जूनपासून सुरु होणार आहे. 24 जुलै रोजी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. नौदलाकडून 25 जून जूनपर्यंत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला भरती प्रक्रियेसाठी जाहिराती पाठवण्यात येतील.
हवाईदलाप्रमाणे नौदलाचीही ऑनलाइन अर्ज प्रक्रिया असेल. अग्निपथ योजनेअंतर्गत सुमारे 40,000 अग्निविरांची भरती केली जाणार आहे. अग्निवीरांची दुसरी तुकडी पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत लष्करात दाखल होणार आहे. भारतात ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अग्निपथ योजनेअंतर्गत भरती मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे.
या योजनेअंतर्गत महिला आणि पुरुष अशी दोघांचीही भरती करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात अग्निविरांची तुकडी 21 नोव्हेंबरपासून प्रशिक्षण संस्थांना अहवाल देण्यास सुरुवात करेल. भारतीय नौदल सुरुवातीला या योजनांतर्गत होणाऱ्या भरतीचा तपशील घेणार आहे. पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण हे 30 डिसेंबरपासून होणार आहे.
भारतीय वायूसेना 24 जूनपासून अधिकृत नोंदणीसाठी सुरुवात करणार आहे. अग्निवीरांच्या सेवाशर्ती या नियमित सैनिकांप्रमाणेच असणार आहेत. येणाऱ्या चार ते पाच वर्षांमध्ये अग्निविरांची संख्या 50,000 ते 60,000 असेल असं देखील सांगण्यात आलं आहे.