Friday, January 30, 2026
Homeमहाराष्ट्रबँक कर्मचाऱ्यांच्या संपाचा जबरदस्त फटका; कोल्हापूरमध्ये ३५० कोटींचे व्यवहार ठप्प

बँक कर्मचाऱ्यांच्या संपाचा जबरदस्त फटका; कोल्हापूरमध्ये ३५० कोटींचे व्यवहार ठप्प

देशातील बँकिंग क्षेत्रासाठी पाच दिवसांचा आठवडा करावा,(transactions) या प्रमुख मागणीसाठी संयुक्त बँक कर्मचारी संघटनांनी आज देशभरात ऑल इंडिया bankingबँक संप पुकारला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या यूएफबीयू नेतृत्वाखाली या संपात सार्वजनिक बँक अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले आहेत. संपामुळे जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रातील सुमारे ३५० कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत.संपामुळे महाराष्ट्र, कोल्हापूरसह मुंबई, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, सांगली, नाशिक, नागपूर आदी जिल्ह्यांत संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बँकांतील व्यवहार पूर्णतः ठप्पचा परिणाम व्यापारी, औद्योगिक आणि सर्वसामान्य ग्राहकांवर झाला.

 

वाढता कामाचा ताण, मनुष्यबळाची कमतरता यांमुळे कर्मचाऱ्यांच्या (transactions)शारीरिक, मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. परिणामी, ग्राहक सेवेच्या गुणवत्तेवर तसेच बँकांच्या एकूण कार्यक्षमतेवरही विपरीत परिणाम होत आहे.सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचारी आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या देशव्यापी संपात एआयबीओसी, एआयबीईए, बीईएफआय, आयएनबीईएफ, आयएनबीओसी, एनओबीडब्ल्यू, एनओबीओ या संघटना सहभागी झाल्या आहेत.

 

त्यांनी सरकारने बँक कर्मचाऱ्यांच्या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान, लक्ष्मीपुरीतील येथील बँक ऑफ इंडियासमोर बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे सदस्य, पदाधिकाऱ्यांनी जमून मागण्यांच्या अनुषंगाने घोषणा दिल्या.देशभरातील १८ लाख बँक कर्मचारी, तर जिल्ह्यातील ५०० बँकांतील सुमारे चार हजार अधिकारी, कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. सर्व शनिवार सुटीचे दिवस म्हणून घोषित करावेत, ही संघटनांची मुख्य मागणी आहे.

 

 

हा प्रस्ताव मार्च २०२४ मध्ये इंडियन बँक्स असोसिएशनसोबत झालेल्या (transactions)बाराव्या द्विपक्षीय करारामध्येत समाविष्ट केला होता. मात्र, त्याला अद्याप केंद्र सरकारकडून औपचारिक मान्यता मिळालेली नाही.आजचा ऑल इंडिया बँक संप हा बँक कर्मचाऱ्यांच्या सहनशक्तीचा स्फोट आहे. महाराष्ट्रभर कर्मचाऱ्यांनी निर्धाराने काम बंद ठेवून संदेश दिला आहे. पाच दिवसांचा आठवडा कोणतीही तडजोड न करता लागू करावाच लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -