Friday, November 22, 2024
Homeअध्यात्मतुम्ही जर केला 'ही' चूक: तर कधीच होणार नाही तुमच्यावर दत्तकृपा

तुम्ही जर केला ‘ही’ चूक: तर कधीच होणार नाही तुमच्यावर दत्तकृपा



मित्रांनो तुम्ही दत्तभक्ती करता का? तुमच्या घरामध्ये दत्तभक्ती असेल तर घरामध्ये मांसाहार किंवा दारू-मद्यपान करू नये. कारण दत्तभक्ती करत असताना दत्त महाराजांना प्रसन्न करण्यासाठी या दोन गोष्टी पाळणे तुम्हाला अत्यंत गरजेचे आहे.

मित्रांनो, दत्त महाराज म्हणतात ज्या घरात मांसाहार व मद्यपान होते त्या घरात माझी कृपा कधी होणार नाही कारण ज्या घरात मांसाहार आणि मद्यपान होते त्या घराचे पावित्र्य राहत नाही. त्याच्यामुळे दत्त महाराजांनी मांसाहार व मद्यपान का करू नये हे गुरुचरित्रात सांगितलेले आहे.

उदाहरणासाठी एक गोष्ट पाहू..
मित्रांनो, एक राजा होता. त्याच्या मांडीला गळू उठतो. अनेक ठिकाणी जाऊनही त्याचा गळू बरा होत नाही. तर तो त्यांच्या मंत्र्यांना विचारून थेट गाणगापुरात संगमावर जातो. संगमावर स्वामी नरसिंह सरस्वती दत्त महाराजांचे दुसरे अवतार होते ते आंघोळीसाठी गेलेले असतात.

तो राजा एकदा त्यांना भेटायला जातो. स्वामी हसतात. त्याला पाहून म्हणतात, कसा आहेस? त्यावर राजाला आश्चर्य वाटते. तर राजा स्वामींना म्हणतो, स्वामी माझ्या मांडीला गळू उठलाय त्याच्यामुळे मी तुमच्या दर्शनासाठी आलो आहे.

या असहाय्य सहाय्य वेदनेतून मला मुक्त करा. तर स्वामी त्याच्या डोक्यावर हात ठेवतात व म्हणतात, अरे तू मला ओळखलं नाहीस का? त्यावेळेस त्याच्या पूर्व जन्माची सर्व कहाणी, सर्व हकीकत त्या परटाला म्हणजे त्या मुस्लिम राजाला सांगतात.

त्यावेळेस राजाला लक्षात येते की तो पूर्वजन्मी एक परिट असतो आणि परिट असताना श्रीपाद श्रीवल्लभ त्याला आशीर्वाद देतात ते पुढच्या जन्मी तु मुस्लिम राजा होशील. ही सर्व हकीकत त्याला आठवते. तो स्वामींच्या पाया पडतो व दुःखआश्रू त्याच्या डोळ्यातून निघून येतात.

त्यानंतर स्वामींना म्हणतो, तुम्ही माझ्या राज्यांमध्ये या. तर त्यावर स्वामी म्हणतात, म्हणजे दत्त महाराज म्हणतात, अरे राजा तुझ्या राज्यात मांसाहार व मद्यपान खूप होतो. त्याच्यामुळे तुझ राज्य पावित्र नाही. त्यामुळे मी तुझ्या घरी येऊ शकत नाही. तर तू या गोष्टी पहिल्यांदा बंद कर. या गोष्टी बंद केल्यानंतर मी तुझ्या राज्यांमध्ये येईन.

राजा सर्व मान्य करतो व महाराजांना म्हणतो, स्वामींना म्हणतो, हे स्वामी राया माझ्यावर कृपा करा आणि माझा गळू बरा करा. तर स्वामी हसून त्याला म्हणतात की अरे बाबा तुझा गळू कुठे आहे ते मला दाखव. काय आश्चर्य त्याचा गळू गळून गेलेला असतो. म्हणजे त्या जागीच नसतो.

तर या गुरुचरित्रातून, अध्यायातून एकच गोष्ट सांगायची आहे ज्या ठिकाणी मांसाहार किंवा मद्यपान करतात तेथे दत्त महाराजांची कृपा होत नाही.

मी तुम्हाला हात जोडून सांगतो की तुम्ही जर दत्तभक्ती करत असाल, दत्त मार्गात असाल, दत्तसंप्रदायत असाल तर तुम्ही मांसाहार व मद्यपान करू नका. दत्तमहाराजांची कृपा जर तुम्हाला जर हवी असेल तर या दोन गोष्टींचा नियम तुम्हाला पाळावा लागेल.

वरील माहिती ही स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली त्याचा कुणीही अंधश्रद्धे शी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या वेगळ्या माहितीसाठी आमच्या पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -