Sunday, November 3, 2024
Homeकोल्हापूरसार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन : फक्त 10 कार्यकर्त्यांना परवानगी

सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन : फक्त 10 कार्यकर्त्यांना परवानगी


सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी (अनंत चतुर्दशी) इराणी खण येथे व्यवस्था करण्यात आली असून, शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. विसर्जनासाठी येणार्या मंडळाच्या सार्वजनिक गणेशमूर्ती सोबत केवळ 8 ते 10 कार्यकर्तेच सहभाग होऊ शकतील, अशी सूचना पोलिस प्रशासनाने दिली आहे. तसेच विसर्जनाला इराणी खणीकडे जाण्यासाठी पाच प्रमुख मार्ग देण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्त्वाखाली 122 अधिकारी, 1561 पोलिस कर्मचारी, 1500 होमगार्ड असा फौजफाटा असणार आहे. गणेश विसर्जनावेळी मिरवणुकांना मनाई असून, महाद्वार रोडवरही मंडळांना प्रवेश बंद राहणार आहे. रविवारी (दि.19) पहाटेपासूनच शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे.


सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन मार्ग
• संभाजीनगर, न्यू महाद्वार रोड, शाहू बँक, मंगळवार पेठ या परिसरातील गणेश मंडळांनी नंगीवली चौक, 8 नं. शाळामार्गे इराणी खणीकडे जाणार्या मार्गाचा वापर करावा.
• राजारामपुरी, जवाहरनगर, सुभाषनगर येथील गणेश मंडळांनी सायबर चौक, आयसोलेशन हॉस्पिटल, संभाजीनगर स्टँडमार्गे इराणी खणीकडे मार्गस्थ व्हावे.
• उद्यमनगर, बागल चौक, शाहू मिल, राजारामपुरी, टाकाळा परिसर येथील गणेश मंडळांनी गोखले कॉलेज, हॉकी स्टेडियम, संभाजीनगरमार्गे इराणी खणीकडे मार्गस्थ व्हावे.
• शिवाजी पेठ, उत्तरेश्वर पेठ, रविवार पेठ येथील गणेश मंडळांनी त्यांच्या प्रतिष्ठापना ठिकाणाहून गंगावेश, रंकाळा टॉवरमार्गे इराणी खणीकडे मार्गस्थ व्हावे.
• लक्ष्मीपुरी, शाहूपुरी परिसरातील गणेश मंडळांनी बिंदू चौक, छ. शिवाजी महाराज पुतळा, पापाची तिकटी, गंगावेशमार्गे इराणी खणीकडे मार्गस्थ व्हावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -