ताजी बातमी ऑनलाईन टीम
येथील पंचगंगा नदी काठावर आपल्या चिमुकलीसह आत्महत्येच्या उद्देशाने आलेल्या विवाहीतेस सतर्क नागरीकांमुळे जीवनदान मिळाले. शिवाजीनगर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि नातेवाईकांना समज देऊन मुलीसह विवाहीतेला त्यांच्या स्वाधीन केले.
येथील पंचगंगा नदी घाटाकडे आपल्या चिमुकलीसह एक विवाहीता जाताना काही नागरीकांना दिसली. ती आत्महत्येच्या प्रयत्नात असल्याचे त्यांच्या लक्षात येताच फिरोज नदाफ, अनिल पाटोळे यांनी तिला थांबवून शिवाजीनगर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनीही तत्परता दाखवत नदी घाटावर धाव घेऊन मुलीसह विवाहीतेला ताब्यात घेतले. तिला पोलीस ठाण्यात आणून तिच्याकडून आत्महत्येचे कारण समजुन घेतले. जाणून घेऊन नातेवाईकांच्या स्वाधिन केले.
इचलकरंजीत नागरिकांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीसह विवाहितेला आत्महत्येपासून रोखले
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -