Tuesday, August 26, 2025
Homeब्रेकिंगनव्या सरकारचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तर...

नव्या सरकारचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तर कॅबिनेटमध्ये ‘या’ नेत्यांची लागू शकते वर्णी

राज्याच्या राजकीय वर्तुळात (Maharashtra Political Crisis) बुधवारी मोठी त्सुनामी आली. या त्सुनामीत 36 दिवसांत स्थापन झालेलं आणि अडीच वर्षे चाललेलं महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aaghadi Sarkar) कोसळलं. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. सत्तानाट्याचा अखेर उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने (Udhav Thackeray Resignation) झाला. आता राज्यात सत्ता स्थापनेसाठी भाजपने पडद्यामागून हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची आज, गुरुवारी घरवापसी होणार आहे. गटनेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुंबईत दाखल होणार आहेत. नव्या सत्तेची गणितं मांडली जाणार आहेत. भाजपच्या कोअर टीमची (BJP) आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. महाराष्ट्र प्रभारी सी.टी रवी (T C Ravi) मुंबईत येण्याची शक्यता आहे.

नव्या सरकारचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला?
भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री (Devendra Fadanvis) तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार आहेत. विशेष म्हणजे नव्या सरकारमध्ये गृहमंत्रिपद हे देवेंद्र फडणवीस स्वतःकडेच ठेवणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर सामान्य प्रशासन विभाग देखील ते स्वत:कडेच ठेवण्याची शक्यता आहे. मागील फडणवीस सरकारमधील 23 ते 24 आमदारांना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यत आहे. तर शिंदे गटातील 13 ते 14 जणांना मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.

संभाव्य मंत्रिमंडळाबाबत झाली चर्चा…
भाजप आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटामध्ये संभाव्य मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपच्या कोट्यात 18 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री असे एकून 28 मंत्री तर एकनाथ शिंदे गटाला 6 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्री पद मिळणार आहेत.

नव्या मंत्रिमंडळात या नेत्यांची लागू शकते वर्णी

कॅबिनेट मंत्री

देवेंद्र फडणवीस
चंद्रकात पाटील
सुधीर मुनगंटीवार
गिरीश महाजन
आशिष शेलार
प्रवीण दरेकर
प्रसाद लाड
मंगलप्रभात लोढा
रवींद्र चव्हाण
चंद्रशेखर बावनकुळे
विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख
गणेश नाईक
राधाकृष्ण विखे पाटील
संभाजी पाटील निलंगेकर
राणा जगजितसिंह पाटील
संजय कुटे
डॉ. अशोक उईके/ विजयकुमार गावित
सुरेश खाडे
जयकुमार रावल
अतुल सावे
देवयानी फरांदे
रणधीर सावरकर
जयकुमार गोरे
विनय कोरे, जनसुराज्य
परिणय फुके

हे राज्यमंत्री होण्याची शक्यता

नितेश राणे
प्रशांत ठाकूर
मदन येरावार
महेश लांडगे किंवा राहुल कुल
निलय नाईक
गोपीचंद पडळकर

एकनाथ शिंदे गटातील या नेत्यांना मिळू शकते मंत्रिपद…

कॅबिनेट मंत्री

एकनाथ शिंदे
गुलाबराव पाटील
उदय सामंत
दादा भुसे
अब्दुल सत्तार
संजय राठोड
शंभूराज देसाई
बच्चू कडू
तानाजी सावंत
दीपक केसरकर

या नेत्यांना मिळू शकते राज्यमंत्रिपद…
संदीपान भूमरे
संजय शिरसाट
भरत गोगावले

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -