Wednesday, July 30, 2025
Homeमहाराष्ट्रएलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, आजपासून १९८ रुपयांनी..

एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, आजपासून १९८ रुपयांनी..

ताजी बातमी ऑनलाईन टीम

एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर झाले आहे. आज इंडेनचे सिलिंडर दिल्लीत १९८ रुपयांनी स्वस्त झाले आहे. एलपीजी (LPG) सिलिंडरच्या दरामध्ये कोलकात्यात १८२ रुपयांनी घट झाली आहे. दुसरीकडे मुंबईत १९०.५० रुपये, तर चेन्नईत १८७ रुपयांनी घट झाली आहे. पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑईलने (Indian Oil) कमर्शियल सिलिंडरच्या दरातही कपात केली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. १४.२ किलोचा घरगुत सिलिंडर स्वस्त झालेला नाही. आताही तो १९ मे रोजीच्या दरानेच मिळत आहे.



शहरनिहाय १४.२ किलोच्या सिलिंडरचे दर रुपयात (राऊंड फिगरमध्ये) दिल्ली १,००३ मुंबई १,००३ कोलकाता १,०२९ चेन्नई १,०१९ लखनौ १,०४१
जयपुर १,००७
पाटणा १,०९३
इंदूर १,०३१ अहमदाबाद १,०१० पुणे १,००६ गोरखपुर १०१२ भोपाळ १००९
आग्रा १०१६
रांची १०६१

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -