ताजी बातमी ऑनलाईन टीम
मिरज : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील वारकऱ्यांच्या दिंडीत बोलेरो कार घुसून अपघात झाला. सांगली जिल्ह्यातील मिरज पंढरपूर रोडवरील केरिवडे येथे हा अपघात झाला. या अपघातात शाहूवाडी तालुक्यातील कापशीतील १३ वारकरी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांना उपचारासाठी मिरजमधील सिविल रुग्णालयात दाखल केला आहे.
या अपघातात बोलेरो गाडी पलटी होत काही अंतरावर फडफडत गेली. अपघातानंतर चालक पसार झालेला आहे. नागरिकांनी दिंडीतील जखमी वारकऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.






