Tuesday, November 25, 2025
Homeब्रेकिंगBuilding Materials: सळई, सिमेंटसह वीट ही झाली स्वस्त, काय आहेत भाव?...

Building Materials: सळई, सिमेंटसह वीट ही झाली स्वस्त, काय आहेत भाव? जाणून घ्या

देशभरात मान्सूनने डेरा टाकला आहे. जून कोरडा गेल्यावर आता जुलै महिन्याकडून मोठ्या आशा लागल्या आहेत. पावसाळ्याचा थेट परिणाम होतो तो घराच्या बांधकामांवर पाऊस पडल्यामुळे बांधकाम क्षेत्रातील कामे थंडावतात. पावसाळ्यात बांधकाम क्षेत्रासाठी लागणारी वाळू सिमेंट(Cement) आदींची कमतरता सुरु होते. परिणामी यांच्या भावात चांगलीच वाढ (Price Hike) होते. नदीला पूर आल्याने वाळूही भेटत नाही. त्याचा ही परिणाम बांधकामांवर दिसून येतो. वाळू आणि सिमेंटचे दर वाढतात. बांधकाम साहित्य (Building Materials) मार्च ते एप्रिल महिन्यात खूप वाढले होते. गेल्या महिन्यात देशातील विविध शहरात सळईचा भाव 4500 रुपये प्रति टन महाग होता. त्यानंतर भावात कमालीची घसरण झाली. परंतू आता सळई, सिमेंट आणि वीट ही स्वस्त झाली आहे.अजून मान्सूनने देशाच्या काही भागात अजूनही ओढ दिली आहे. जून महिना तर मान्सूनची वाट पाहण्यात गेला. जुलै महिन्याच्या 5 दिवसातही अजून पावसाने काही भाग वगळता जोर दाखवलेला नाही. त्यामुळे या काळात तुम्ही घर बांधायला सुरुवात केली असेल तर दर वाढण्यापूर्वी त्वरीत बांधकाम साहित्य खरेदी करा. नाहीतर पन्हा भाव वाढण्याची शक्यता आहे.,

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -