बिटकॉइन (BTC) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये आज ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला असल्याचे सांगण्यात येते आहे. 2 आठवड्यापासून बिटकॉइनची किंमत जवळपास 6 लाखांनी घसरली आहे. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत असल्याचे क्रिप्टो मार्केटमधील जाणकारांचे म्हणणे आहे. या घसरणीचा गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला असून आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत 17 लाखापेक्षा कमी झाली आहे.
आजचा बिटकॉइनचा दर : आंतरराष्ट्रीय बाजारात बिटकॉइनचा दर हा 20 हजार 477 इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात 16,25,575.62 लाख रुपये इतका आहे.
दरम्यान, क्रिप्टोकरन्सीची सध्या जगभरात चर्चा सुरू असताना आधी सर्वात जास्त रिटर्न देत असल्याने क्रिप्टोकरन्सीची सर्वाधिक चर्चा सुरू होती. मात्र, आता यात घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीचा फुगा फुटला असल्याचे काहींचे म्हणणे आहे. तर हे फक्त काही दिवसांपर्यंत असून क्रिप्टो पुन्हा एकदा झेप घेईल, असे जाणकारांना वाटत आहे