Thursday, June 26, 2025
Homeब्रेकिंगया गावात शिवसेनेला जबरदस्त झटका; हजारो कार्यकर्ते एकनाथ शिंदे गटात सामील

या गावात शिवसेनेला जबरदस्त झटका; हजारो कार्यकर्ते एकनाथ शिंदे गटात सामील

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी(Eknath Shinde ) बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत.दरम्यान ग्रामीण भागात देखील सेनेत दोन गट पहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे गटाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा वाढत आहे. आमदार आणि खासदारांपाठोपाठ राज्यातील अनेक महापालिका तो नगपालिकांचे नगरसेवक शिवसेनेत दाखल होत आहेत. त्यातच आता शिवसनेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिंदे गटाला पाठिंबा देताना दिसत आहेत. सोलापुरात देखील शिवसेनेला जबरदस्त झटका बसला आहे. हजारो कार्यकर्ते एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत.

शिंदे गटाला सोलापूर जिल्ह्यातुन पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली आहे.आमदार तानाजी सावंत यांचे मुळ गाव असलेल्या वाकाव गावात माढा, मोहोळ, पंढरपुर तालुक्यासह कुडूवाडी शहरातील हजारो शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा जयघोष करीत पाठिंबा दर्शवत त्यांच्या गटात प्रवेश केला आहे.यावेळी महिला शिवसैनिक देखील उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -