NDA : महिला उमेदवारांना प्रवेश देण्यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आवश्यक ती तयारी करीत असल्याची माहिती केंद्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात दिली.
महिलांचा एनडीए प्रवेश नाकारण्याबाबत केंद्र सरकारने दिलेली कारणे धुडकावून लावत अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने महिलांचा एनडीए प्रवेशाचा मार्ग मोकळा केला होता.
महिला उमेदवारांना मे 2022 पासून एनडीए प्रवेश परिक्षा देता येईल, असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे.
महिलांना एनडीए प्रवेश नाकारणे म्हणजे लैंगिक भेदाभेद असल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली होती. केंद्राची कानउघडणी करीत महिलांसाठी एनडीएचे प्रवेशद्वार उघडे करण्याचा निकाल न्यायालयाने दिला होता.
या अनुषंगाने केंद्राने आता अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. महिला उमेदवारांच्या प्रवेशासाठी एनडीएकडून शारिरीक क्षमतांची निश्चिती करणे, पायाभूत सुविधांची निर्मिती तसेच इतर आवश्यक बाबींची तयारी केली जात आहे, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.
NDA : मे २०२२ पासून महिला उमेदवारांना एनडीए प्रवेश परिक्षा देता येणार!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -