Tuesday, March 11, 2025
Homenewsकोल्हापूर हादरलं! दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या…..

कोल्हापूर हादरलं! दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या…..

गेल्या काही दिवसांपासून देशभरातून महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. नुकतेच बदलापूरात दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील सफाई कर्माचाऱ्याने अत्याचार केल्याने राज्यातील नागरिकांत संताप असताना आता कोल्हापूरातून एक घक्कादायक घटना समोर आली आहे.

कोल्हापुरातील शिये गावातील रामनगर परिसरात दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. सबंधित मुलगी काल दुपारपासून बेपत्ता होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयीतााना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान या प्रकरणातील पीडित मुलगी मूळची बिहारची असून, ती आपल्या आई-वडील आणि पाच भावंडांबरोबर रामनगर परिसरात राहत होती. मुलीचे आई-वडील शिरोली एमआयडीसीतील एका कारखान्यात मजूर म्हणून कामाला जात होते. सकाळपासून मुलगी बेपत्ता असल्याने तिच्या पालकांनी शिरोली एमआयडीसी पोलिसांत काल सायंकाळी तक्रार दाखल केली होती.

यानंतर आज पोलिसांनी डॉग स्कॉडच्या मदतीने मुलीला शोधून काढले. शियेपासून काही अंतरावर असलेल्या शेतात या पीडित मुलीचा मृतदेह पडलेला सापडला. मुलीचा मृतदेह आता वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, वैद्यकीय अहवाल आल्यानंतर याबाबत अधिकचा खुलासा करता येईल असे पोलिसांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -