Thursday, July 3, 2025
Homeसांगलीनागपंचमीच्या 'मुहूर्तावर महावितरणाकडून वीज खंडीत; व्यापारी वर्गातून नाराजी

नागपंचमीच्या ‘मुहूर्तावर महावितरणाकडून वीज खंडीत; व्यापारी वर्गातून नाराजी


शिराळा; शिराळ्याच्या जगप्रसिद्ध नागपंचमीचा सण अवघ्या एक दिवसावर आला असताना वीज वितरण कंपनी कडून वेगवेगळी कारणे देत सतत वीज पुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे नागरिकांसह व्यापारी वर्गातून वीज वितरण कंपनीच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.



गेली दोन वर्षे कोरोना प्रादुर्भामुळे लोकांना सण साजरे करता आले नाहीत. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने या वर्षी सण उत्साहात साजरे होत आहेत. शिराळ्यातही जगप्रसिद्ध असणारा नागपंचमी हा सण यंदा मंगळवारी २ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. सध्या कोरोनाचे संकट दूर झाल्याने सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. व्यापारी वर्ग देखील मोठ्या उत्साहाने तयारी लागला आहे. मात्र ऐन नागपंचमीच्या तोंडावर वीज वितरण कंपनी ओव्हरलोड, होल्टेज प्रॉब्लेम, माकडांचा व पक्षांचा विद्युत वाहिनीवर उपद्रव होत असल्याची बालिश कारणे देत सातत्याने वीज पुरवठा खंडित करत आहेत. याचा नाहक त्रास व्यापारी वर्गाला होत आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाचे व नागपंचमीसाठी बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांचे हाल होत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -