Friday, July 4, 2025
Homeतंत्रज्ञानID : आधार कार्ड-मतदानओळखपत्र लिंक मोहिम आजपासून, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया...

ID : आधार कार्ड-मतदानओळखपत्र लिंक मोहिम आजपासून, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…


केंद्रीय निवडणूक आयोग आजपासून मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंकची मोहिम सुरु करणार आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांनी आजपासून हा उपक्रम सुरु करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मतदार याद्या अधिकाधिक बिनचूक करण्यासाठी ही मोहिम राबविण्यात येणार आहे.

Aadhaar card linkages voter ID : काय आहे या मोहिमेचा हेतू ? मतदार यादीमध्ये दोनवेळा नावे असणे, पत्ता अपूर्ण असणे आदी चुका आढळून येत होत्या. मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक केल्यामुळे एकाच व्यक्तीचे एकापेक्षा अधिक मतदारसंघात किंवा त्याच मतदारसंघात एकापेक्षा अधिक वेळा नावाची नोंदणी तपासणी अधिक सोपी होणार आहे. तसेच मतदारांची ओळख पटवणे, मतदार यादीत असणारी माहितीची तपासणेही अधिक सोपे होणार आहे.

सोपी पद्धत पुढील प्रमाणे.


• सर्वप्रथम नॅशनल व्होटर सर्विस पोर्टल ( एनव्हीएसपी)
वेबसाईटला (https://www.nvsp.in ) भेट द्या. येथे लॉग इन करा. तुमची नोंदणी नसेल तर नवीन यूजर म्हणून नाव नोंद करा. • nvsp वेबसाईटच्या होम पेजवरील search in Electotal वर क्लिक करा. येथे मतदान ओळखपत्र, ईपीआयसी नंतर आणि स्टेट टाकून सर्च करा. • यानंतर Feed Aadhaar No या पर्यायावर क्लिक करा. • येथे ओपन होणाऱ्या विंडोवर तुम्हाला तुमच्या आधार
कार्डसंदर्भातील माहिती द्यावी लागेल. • यानंतर तुम्ही ओळख तपासणीसाठी तुमच्या नोंदणी असणाऱ्या
मोबाईल क्रमांक आणि ईमेलवर एक ओटीपी येईल. • हा ओटीपी देवून तुम्ही सबमिटवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र लिंक झाल्याची माहिती मिळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -