Wednesday, August 6, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : गोविंदांचा आज थरार

कोल्हापूर : गोविंदांचा आज थरार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर : ‘गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजबाला… आदी गाण्यांच्या तालात, शरीरिक समन्वय साधत उंचच्या उंच मानवी मनोरे करून लाखो रुपयांच्या बक्षिसांची दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर यंदा दहीहंडीचा सोहळा होणार असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, यंदाच्या दहीहंडी सोहळ्याला राजकीय पक्षांच्या सहभागाची किनार असल्याने लाखो रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव पाहायला मिळणार आहे.



कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे गेली दोन वर्षे दहीहंडीचा सोहळा झाला नव्हता. यंदा कोरोनाचा कहर कमी झाल्याने इतर सणउत्सवांप्रमाणेच गोकुळ अष्टमीनिमित्त दहीहंडीचा सोहळा निबंधमुक्त पद्धतीने साजरा होणार आहे. याची जय्यत तयारी संयोजक तसेच पोलिस व मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी 4 पासून दहीहंडीचा थरार सेलिब्रिटींची उपस्थिती, नृत्याविष्कार आणि अत्याधुनिक साऊंड सिस्टीम व लेसर शो अशा विविधतेत पाहायला मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -