कोल्हापूर जिल्ह्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) या दुर्मिळ आजाराने पहिला बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कळंबा येथील ११ वर्षीय राजवर्धन नितीन बुचडे या शाळकरी मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. या घटनेमुळे कळंबा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य विभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.(Kolhapur GBS Death)
कळंबा गावात आरोग्य विभागाची धावपळ
राजवर्धनच्या मृत्यूची घटना समोर आल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कळंबा गावात घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. तसेच GBS सदृश लक्षणे असलेल्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी विशेष सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेण्यासोबतच संशयित रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य कर्मचारी प्रयत्नशील आहेत.(Kolhapur GBS Death)

काय आहे GBS आजार?
गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा मज्जासंस्थेवर परिणाम करणारा दुर्मिळ आजार आहे. या आजारात शरीराची रोगप्रतिकारशक्ती चुकून स्वतःच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते. त्यामुळे हात-पायांमध्ये अशक्तपणा येणे, मुंग्या येणे आणि स्नायूंची ताकद कमी होणे अशी लक्षणे दिसतात. काही रुग्णांमध्ये हा आजार वेगाने वाढून चालणे, गिळणे आणि श्वास घेणेही कठीण होऊ शकते.(Kolhapur GBS Death)
कोणती लक्षणे दिसल्यास सावध व्हावे?
हात-पायांना मुंग्या येणे, पायांमध्ये वाढता अशक्तपणा, चालताना अडचण येणे, स्नायूंची ताकद कमी होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही GBS ची प्रमुख लक्षणे आहेत. अशी लक्षणे जाणवल्यास दुर्लक्ष न करता तातडीने रुग्णालयात जावे.(Kolhapur GBS Death)
वेळेत उपचार घेणे महत्त्वाचे
GBS हा संसर्गजन्य आजार नाही. मात्र, काही वेळा जिवाणू किंवा विषाणूंच्या संसर्गानंतर शरीरात निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्तीच्या प्रतिक्रियेमुळे हा आजार उद्भवू शकतो. योग्य वेळी निदान झाल्यास इम्युनोग्लोब्युलिन (IVIG) किंवा प्लाझ्मा एक्स्चेंजसारख्या उपचारांनी रुग्णाला मदत होऊ शकते. राजवर्धनच्या मृत्यूमुळे कोल्हापूर जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि संशयास्पद लक्षणे दिसताच वैद्यकीय मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.(Kolhapur GBS Death)