लक्ष्मी नगर येथे नवरात्र मंडळाच्या ठिकाणी जेवण करीत असता चेष्टा केल्याने कोयत्याने हल्ला करून एकास जखमी केले आहे . याबाबत अधिक माहिती अशी की ,लक्ष्मी नगर येथे हिंदवी स्वराज्य नवरात्र मंडळ असून ,या ठिकाणी दुपारी दीडच्या सुमारास जेवण करीत असता , चेष्टा मस्करी केल्याचा राग येऊन भांडण झाले व त्यातून फिर्यादी आकाश अमर शिंदे , वय 26 वर्ष , राहणार लक्ष्मी नगर ,जुना बुधवार रोड सांगली , यास आरोपी नेताजी बाबुराव घाडगे , पवन नेताजी घाडगे , करण नेताजी घाडगे , सर्व राहणार बाळूमामा मंदिराजवळ लक्ष्मी नगर सांगली , यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच कोयत्याने वार करून जखमी केले आहे .
त्यावेळी प्रवीण शिंगे हा भांडण सोडविण्यासाठी मध्ये आला असता ,त्यास लाथा बुक्क्याने मारहाण केली आहे . त्याबाबत आकाश अमर शिंदे यांनी ,आरोपी नेताजी बाबुराव घाडगे ,पवन नेताजी घाडगे , करण नेताजी घाडगे यांच्याविरुद्ध संजय नगर पोलिसात फिर्याद दाखल केली असून , पोलिसांनी कलम 324 , 323 , 504 , 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे . संजय नगर पोलीस सदर गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत .






