मिरज तालुक्यातील मालगाव येथे मोटरसायकलने धडक दिल्याने लहान मुलगी गंभीर जखमी झाली असून अपघातानंतर मोटरसायकल स्वार गाडीसह फरार झाला आहे . याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी यासीन सलामुद्दीन मुजावर , वय 32 वर्षे ,व्यवसाय मजुरी ,राहणार मालगाव पाण्याच्या टाकीजवळ यांची मुलगी एकरा यासीन मुजावर वय 9 वर्ष , राहणार मालगाव हिला मालगाव येथील गांधी किराणा दुकानासमोर संध्याकाळी साडेचार च्या सुमारास ,आरोपी रोहित यलपरटे , राहणार धामणे गल्ली मालगाव ,यांनी त्याच्या ताब्यातील मोटरसायकल भरधाव वेगाने चालवून ,किराणा दुकानात बाजार आणण्यासाठी जात असलेल्या एकरा। हिला जोरदार धडक दिली .
या अपघातामध्ये एकरा ही मुलगी गंभीर जखमी झाली असून , अपघातानंतर मोटरसायकल स्वार वाहनासह पळून गेला आहे . याबाबत यासीन सलामुद्दीन मुजावर यांनी , आरोपी रोहित यलपरटे याच्याविरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल केली असून , मिरज ग्रामीण पोलीस ,सदर अपघाताच्या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत .






