शिवसेनेसंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या दोघांच्या दाव्यांनंतर भारताच्या निवडणूक आयोगाने अंतरिम आदेश जाहीर केला आहे. तसेच अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत “शिवसेनेसाठी” राखीव असलेले “धनुष्य आणि बाण” चिन्ह वापरण्याची परवानगी दोन्ही गटांपैकी कोणालाही दिली जाणार नाही असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीत ठाक आणि शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही. निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत (Andheri Bypoll Election) शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटांना पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्यास बंदी घातली आहे.
राजीव कुमार यांच्यासह इतर आयुक्त, निवडणूक चिन्ह प्रभारी, निवडणूक न्याय विभागाचे अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकारी बैठकीला उपस्थित होते. शिंदे आणि ठाकरे गटानं काल कागदपत्रे सादर केली होती. शिवसेनेच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाने आपापल्या पक्षांसाठी सोमवारपर्यंत तीन नवीन नावे आणि चिन्हे सुचवण्यास सांगितले आहे. आयोग दोन्ही गटांना त्यांनी सुचविलेली नावे आणि चिन्हे वापरण्याची परवानगी देईल. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जवळ आल्याने शिंदे गटाच्या विनंतीवरून आयोगाने अंतरिम आदेश जारी केला आहे. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही गटांना आयोगाला पर्याय द्यावे लागणार असल्याची माहिती आहे.
मोठी बातमी! शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं! पक्षाचं नावदेखील वापरता येणार नाही
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -






