जगातील सर्वात प्रिमियम आणि लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड असलेल्या Apple कंपनीचा स्मार्टफोन iPhone वापरण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पण हे आयफोन महाग असल्यामुळे अनेकांना ते खरेदी करता येत नाही. पण सध्या फेस्टिवल ऑफरमध्ये आयफोन सुद्धा स्वस्तामध्ये खरेदी करता येत आहे. Apple कंपनीने गेल्या महिन्यात 7 सप्टेंबर 2022 रोजी फ्लॅगशिप स्मार्टफोन्सची नवीनतम सीरिज iPhone 14 लाँच केली. या सीरिजमधील नवीन मॉडेल iPhone 14 Plus इतर मॉडेल्ससह भारतात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले नव्हते. ते भारतात 7 ऑक्टोबर 2022 पासून विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला स्वस्तामध्ये खरेदी करता येऊ शकतो तो कसा हे आज आपण जाणून घेणार आहोत….
iPhone 14 Plus हा स्मार्टफोन 22 हजार रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंटमध्ये खरेदी करू शकता. iPhone 14 Plus च्या 128GB स्टोरेज वेरिएंटबद्दल आम्ही सध्या बोलत आहोत. हा स्मार्टफोन 89,900 रुपये किमतीत लॉन्च करण्यात आला आहे. जर तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करताना तुम्ही HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला एकूण 2,750 रुपयांची सूट मिळेल म्हणजेच iPhone 14 Plus ची किंमत तुमच्यासाठी 87,150 रुपये असेल.
एवढ्या मोठ्या सवलतीसाठी बँकेच्या ऑफरसोबतच, तुम्हाला डीलमध्ये समाविष्ट असलेल्या एक्सचेंज ऑफरचा लाभ घ्यावा लागेल. जुन्या फोनच्या बदल्यात हा स्मार्टफोन खरेदी करून तुम्ही 19,900 रुपयांपर्यंत बचत करू शकता. या ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास तुम्ही एकूण 22,650 रुपयांच्या सवलतीनंतर 67,250 रुपयांमध्ये iPhone 14 Plus घरी घेऊन जाऊ शकता.
iPhone 14 Plus च्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाले तर, या प्रकारात 128GB स्टोरेजसह 6.7-इंचाचा सुपर रेटिना XDR (XDR) डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन A15 बायोनिक चिपवर काम करतो आणि यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे दोन्हीमध्ये 12MP सेंसर आहेत. iPhone 14 Plus चा फ्रंट कॅमेरा देखील 12MP चा आहे. या 5G स्मार्टफोनमध्ये वाढवता येण्याजोगे स्टोरेज नाही, ऑडिओ जॅक दिला जात नाही आणि क्विक चार्जिंग सपोर्टची सुविधाही यात दिली जात नाही.






