नाशिकमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. खासगी बसला आग लागून 13 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर या अपघातामध्ये 38 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नाशिक-औरंगाबाद मार्गावरील नांदूरनाका येथे शनिवारी पहाटे ही घटना घडली आहे. या आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली आहे.
बसचा नाशिक येथे अपघात झाला. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस आहे. नाशिक- औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर बस आणि टँकर यांच्यात भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतला आणि क्षणात बसला भीषण आग लागली. शनिवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास हा भीषण अपघातात झाला. ही आग इतकी भीषण होती की, यामध्ये बसमधील 13 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर 38 प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये खासगी बसला भीषण आग, 13 प्रवाशांचा होरपळून मृत्यू! ( सविस्तर वाचा )
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -






