ताजी बातमी ऑनलाईन टीम
आज कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima 2022) आहे. या दिवशी चंद्र त्याच्या सोळा कलांमध्ये असतो. रात्रीच्या निरव शांततेत चंद्राच्या शितल प्रकाशात आणि चांदण्यात मसालेदार दूध प्राशण करून ही आजची रात्र साजरी केली जाते. चंद्राच्या प्रकाशाचे अनेक फायदे आहेत यामुळे शरद पौर्णिमेच्या रात्री मसालेदार दूध तयार करुन प्यायले जाते. आज आपण कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मसालेदार दूध केसे तयार करायचे त्याची सोपी रेसीपी (Masala Milk Recipe) काय आहे हे जाणून घेणार आहोत…
मसाले दूध तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
– 1 लिटर फुल क्रीम दूध
– 10 काजू
– 10 बदाम
– 10 पिस्ता
– 100 ग्रॅम साखर
– 1/2 टीस्पून वेलची पावडर
-1 चिमूट जायफळ पावडर
– केशर
असे तयार करा मसाला दूध –
मसाला दूध तयार करण्यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये दूध टाकून गॅसवर ठेवा. मध्यम आचेवर हे दूध उकळण्यासाठी ठेवा. दूध सतत ढवळत राहा जेणे करुन ते करपणार नाही. दूध चांगले होत आले की त्यामध्ये काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप टाका. आता दूध 1/3 झाल्यावर त्यात वेलची पावडर, जायफळ पावडर आणि साखर घालून व्यवस्थित मिक्स करा. यानंतर सर्व ड्रायफ्रुट्स आणि केशर टाकून आणखी पाच मिनिटे दूध उकळवून घ्या. आता एका पातेल्यामध्ये दूध काढा आणि काही वेळ चंद्राच्या प्रकाशात ठेवा. त्यानंतर ग्लास घेऊन त्यामध्ये मसाला दूध टाकून त्याचा आस्वाद घ्या.
कोजागिरी स्पेशल स्वादिष्ट मसाला दूध कसे तयार कराल? पाहा खास रेसिपी!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -