Monday, August 4, 2025
Homeतंत्रज्ञानएक रुपयाही न देता, खरेदी करा ‘ही’ बाईक, सोबत मिळेल बरंच काही…!!

एक रुपयाही न देता, खरेदी करा ‘ही’ बाईक, सोबत मिळेल बरंच काही…!!

यंदाच्या दिवाळीत नवी कोरी दुचाकी घेण्याचा विचार असेल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक असलेल्या होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया कंपनीने अनेक फेस्टिव्हल ऑफर्स आणल्या आहेत.

होंडा कंपनीची लोकप्रिय दुचाकी म्हणजे, होंडा शाइन.. ऑगस्टमध्ये सर्वाधिक विकली जाणारी ही बाईक ठरलीय. कंपनीने नुकतेच या बाईकचे स्पेशल एडिशन सादर केले. त्यात कॉस्मेटिक अपडेट्स व नवी रंगसंगती दिली आहे. मॅट स्टील ब्लॅक मेटॅलिक आणि मॅट संगरिया रेड मेटॅलिक अशा दोन रंगांत ही दुचाकी उपलब्ध आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ‘होंडा शाइन’ तीन ऑफर्ससह खरेदी करता येईल. त्यानुसार एक रुपयाही ‘डाऊन पेमेंट’ न भरता ‘शाइन’ खरेदी करता येईल. शिवाय, कंपनीने ‘नो कॉस्ट ईएमआय’चाही पर्याय दिलाय. शिवाय या दुचाकी खरेदीवर 5 हजारांची कॅशबॅकही मिळू शकते. मात्र, ही ऑफर फक्त 31 ऑक्टोबरपर्यंतच आहे.

होंडा शाईनची वैशिष्ट्ये

– होंडा शाइन सेलिब्रेशन एडिशन 123.94 सीसी, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्‍ट इंजिन आहे. हे इंजिन 7500 आरपीएमवर 10.5 bhp पॉवर आणि 6000 आरपीएमवर 11 एनएम टॉर्क जनरेट करते.
– इंजिनला 5-स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स आहे.
– मागील बाजूस ड्रम ब्रेक, तर पुढच्या चाकाला ड्रम/डिस्क ब्रेकचा पर्याय आहे.
– या दुचाकीला नवीन लूक देण्यासाठी सॅडल ब्राऊन सीट, मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक मफलर कव्हर, गोल्डन कलरचा सेलिब्रेशन लोगो वापरला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -