काही दिवसांतच आयपीएल मिनी लिलाव होणार आहे. यापूर्वी सर्व संघानी रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. अशातच चार वेळची चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जने देखील त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
यावेळी चेन्नई सुपर किंग्जने काही धक्कादायक निर्णय घेतले, त्यातला एक म्हणजे जडेजाला पुन्हा संघात कायम ठेवले, मागील हंगामातील नाराजी विसरून संघाने हा निर्णय घेतला, दुसरा धक्कादायक निर्णय म्हणजे ड्वेन ब्राव्होला संघातून रिलीज केले.
दरम्यान आता असे वृत्त आहे की, सीएसकेचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो IPL ला अलविदा करणार आहे. वृत्तानुसार, ड्वेन ब्राव्हो आता आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही आणि त्यामुळेच त्याने आगामी लिलावासाठी आपले नाव पाठवलेले नाही.
चेन्नई सुपर किंग्जने त्याला या हंगामाच्या लिलावापूर्वी सोडले. ड्वेन ब्रावोने IPL 2023 च्या लिलावासाठी आपले नाव नोंदवलेले नाही. याचा अर्थ आता तो पुढील आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही.
चेन्नई सुपर किंग्जने ड्वेन ब्राव्होला संघातून सोडले आहे, ब्राव्हो या संघाकडून दीर्घकाळ खेळला आहे. ब्राव्हो 2011 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघात सामील झाला होता. तो एक दशकाहून अधिक काळ चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता.
यावेळी त्याला संघाबाहेर ठेवून नवे पर्याय शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गेल्या मोसमात ड्वेन ब्राव्होला चेन्नई सुपर किंग्जने 4.4 कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याने 10 सामन्यात 16 विकेट घेतल्या होत्या.