कोरोना काळात पर्यटकांसाठी बंद असलेल्या ठाण्याच्या घोडबंदर रोड येथील सुरज वॉटर पार्कमध्ये तब्बल सात फूटी मगर आढळल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सायंकाळी समोर आला.
त्या मगरीला पकडून वनविभागामार्फत पुन्हा मुक्तसंचार करण्यासाठी सोडण्यात आले. पण, ही मग Crocodiles in thane कुठून कशी तेथे आली, हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
घोडबंदर रोड परिसरात हे वॉटर पार्क आहे. तसेच ते वॉटर पार्क संजय गांधी राष्ट्रीय उद्यानानजीक असून त्या पार्कमध्ये मगर निदर्शनास आल्यावर येथील कर्मचाऱ्यांनी ‘रॉ’ या वन्यजीव संघटनेच्या स्वयंसेवकांना याबाबत माहिती दिली.
त्या संस्थेच्या लोकांनी सूरज वॉटर पार्क येथे धाव घेत मगरीला सुखरूपपणे ताब्यात घेतले. त्यावेळी ती मगर सात फुटी असल्याचे स्पष्ट झाले. तातडीने त्यांनी ठाणे वनविभागाचे अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीखाली उपचारानंतर मगरीला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेतला.
ठाणे शहराच्या एका नामांकित वॉटर पार्कमध्ये इतकी मोठी मगर आढळल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.