Saturday, January 24, 2026
Homeकोल्हापूरकोल्हापूर : वीस लाखाची फसवणूक आठ जणांवर गुन्हा

कोल्हापूर : वीस लाखाची फसवणूक आठ जणांवर गुन्हा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर ; ग्रामसेवक आणि इतर अधिकाऱ्यांना हाताशी धरून, पूर्वीच विकलेल्या जागेवर प्लॉट पाडल्याचे दाखवून २० लाख २७ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी डेव्हलपरसह ८ जणांविरोधात जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल
झाला. याबाबत इंद्रजीत सितानाथ सामंत (वय ४८, रा. नाळे कॉलनी, संभाजीनगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.



जुना राजवाडा पोलिसांनी याप्रकरणी अमर गणपती पाटील, अश्विनी अमर पाटील (दोघे रा. कळंबा ), विजय सर्जेराव शिंदे, अर्चना विजय शिंदे (रा. यळगूड, हातकणंगले), नम्रता दीपक पाटील, सुशील दीपक पाटील (रा. शिवाजी पेठ), उमेश आनंदराव
मुळे, वर्षा उमेश मुळे (दोघे रा. शिवाजी पूल) यांच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केले आहे. सामंत यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -