नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्या आणि रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेमध्ये बंपर भरती आहे. पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदासाठी मोठी भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात रेल्वेकडून अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात.
भारतीय रेल्वेने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, एकूण 2521 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार रेल्वेची अधिकृत वेबसाईटwcr.indianrailways.gov.in
वर क्लिक करुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून 17 डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 17 डिसेंबर 2022
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 वर्ष ते 24 वर्ष यादरम्यान असणे गरजेचे आहे. आरक्षित प्रवर्गाला सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात आली आह.
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी पास असणे आवश्यक आहे. तसंच उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील आयटीआय (ITI), डिप्लोमा (NCVT किंवा SCVT) असणे देखील गरजेचे आहे.
निवड प्रक्रिया
या भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांची निवड दहावीचे गुण आणि गुणवत्तेच्या आधारे केली जाईल.
असा करा अर्ज
– सर्वात आधी रेल्वेची अधिकृत वेबसाइट wcr.indianrailways.gov.in
ला भेट द्या.
– आता पेजवर आलेला Go To Contacts पर्याय निवडा. यानंतर Recruitment मध्ये जा.
– Railway Recruitment Cell वर क्लिक करा. त्यानंतर 2022-23 साठी Engagement of Act Apprentices For 2022-23 वर क्लिक करा.
– Apply लिंकवर क्लिक करुन नोंदणी करा.
– संपूर्ण अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
– आता अर्ज फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
– अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्यायला विसरू नका.