Thursday, February 6, 2025
Homeक्रीडापुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान, जाणून घ्या किती तारखेला होणार सामना

पुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान, जाणून घ्या किती तारखेला होणार सामना

चालू वर्षाप्रमाणे पुढचं वर्षही टीम इंडियासाठी खास असणार आहे. क्रिकेटप्रेमींना अनेक रंगतदार सामने पाहण्याची मेजवानी मिळणार आहे. पुढच्यावर्षी वनडे वर्ल्ड कप स्पर्धा आहे. या वर्ल्ड कपआधी महिलांची टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा रंगणार आहे. 12 फेब्रुवारीचा दिवस क्रिकेटप्रेमींसाठी विशेष असेल. या दिवशी टीम इंडिया परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. पुरुष टीमचा सामना नसला म्हणून काय झालं? समोर पाकिस्तानची टीम असली, मग सामना कुठलाही असो, भारतीयांचा जोश नेहमीच हाय असतो.

कुठे रंगणार सामना?

10 फेब्रुवारीला ICC महिला टी20 वर्ल्ड 2023 ची सुरुवात होणार आहे. टीम इंडियाच वर्ल्ड कप अभियान 12 फेब्रुवारीला सुरु होणार आहे. भारतीय टीम पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने अभियानाची सुरुवात करेल. केपटाऊनमध्ये हा सामना रंगणार आहे.

कोणाचं पारडं जड असेल?

12 फेब्रुवारीला केपटाऊनच्या पीचवर सामना रंगेल, त्यावेळी कोणाचं पारडं जड असेल?. भारत की, पाकिस्तान? क्रिकेटच्या या फॉर्मेटमध्ये भारताची कामगिरी पाकिस्तानपेक्षा सरस आहे. टुर्नामेंटसाठी भारताने आपली टीम निवडली आहे. आता फक्त सामना सुरु होण्याची प्रतिक्षा आहे.

ग्रुप 2 मध्ये भारतासोबत कुठल्या टीम्स?

टीम इंडिया टुर्नामेंटच्या ग्रुप 2 मध्ये आहे. या ग्रुपमध्ये भारताबरोबर इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि आयर्लंडचे संघ देखील आहेत. म्हणजे पुढचा मार्ग सोपा नसेल. दुसऱ्या टीम्सच सुद्धा आव्हान असेल. प्रत्येक ग्रुपमधून प्रत्येकी दोन टीम्स पुढच्या फेरीत म्हणजे सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील.

वर्ल्ड कपआधी तिरंगी मालिका

T20 वर्ल्ड कप 2023 मध्ये उतरण्याआधी भारतीय टीम दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज विरुद्ध तिरंगी मालिका खेळणार आहे. 19 जानेवारीला सुरु होणारी ही सीरीज 2 फेब्रुवारीपर्यंत चालेल. म्हणजेच हरमनप्रीत अँड कंपनीकडे चूका दुरुस्त करण्यासाठी पुरेसा वेळ असेल.

कधी, कुठल्या टीम विरुद्ध होणार सामना?

12 फेब्रुवारी 2023 रोजी पाकिस्तान विरुद्ध केपटाऊमध्ये सामना रंगेल.
15 फेब्रुवारी 2023 रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध केपटाऊनमध्ये सामना रंगेल.
18 फेब्रुवारी 2023 रोजी इंग्लंड विरुद्ध पोर्ट एलिझाबेथ येथे सामना रंगेल.
20 फेब्रुवारी 2023 रोजी आयर्लंड विरुद्ध पोर्ट एलिझाबेथ येथे सामना रंगेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -