जागतिक स्तरावर युद्धाची परिस्थिती सुरु झाली आणि त्याचा सगळ्या क्षेत्रावर परिणाम झाला.इराणचे संकट अधिक गडद झालं आणि कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली. याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर झाला. जसं युद्ध सुरु झालं त्यानंतर देशांतर्गत शेअर बाजारात प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या काळात शेअर बाजार अनेकवेळा वाढला आणि घसरला. या सगळ्यात Sensex मध्ये मोठ्या प्रमाणावर परिणाम दिसून आला.
Sensex घसरल्यानंतर पुन्हा उसळ
सुरुवातीपासून सेन्सेक्स चांगलाच खाली उतरला. पण दुपारी 2.47 वाजता सेन्सेक्स 969.59 अंकांच्या किंवा 1.30% च्या वाढीसह 75,533.51 वर व्यवहार करत होता. तर निफ्टी 265.80 अंक किंवा 1.15% च्या वाढीसह 23,416.90 अंकांवर पोहोचला. व्यवहारादरम्यान, सेन्सेक्स 1,000 हून अधिक अंकांनी वाढला आणि 500 हून अधिक अंकांनी घसरला. यापूर्वी सलग तीन दिवस घसरण झाली होती.
Sensex मधील 30 पैकी 16 समभाग घसरण
सेन्सेक्समधील 30 पैकी 16 समभाग घसरणीसह उघडले. अल्ट्राटेक सिमेंट, इंडिगो आयटीसी, कोटक बँक, टाटा स्टील, सन फार्मा, एनटीपीसी आणि पॉवर ग्रिड हे शेअर्स वधारले. दुसरीकडे, बीईएल, महिंद्रा अँड महिंद्रा, भारती एअरटेल, इन्फोसिस, एशियन पेंट्स आणि टेक महिंद्रा घसरले. क्षेत्रानुसार, निफ्टी ऑइल अँड गॅसमध्ये सर्वात जास्त 1 टक्क्यांनी घसरण झाली. निफ्टी मेटल 0.5 टक्क्यांनी वधारला. NSE वर, 1,633 समभाग घसरले, 757 शेअर्स वाढले आणि 118 शेअर्स अपरिवर्तित राहिले. ब्रॉडर मार्केटमध्ये निफ्टी मिडकॅप 0.58 टक्के आणि निफ्टी स्मॉलकॅप 1.04 टक्क्यांनी घसरला.
जागतिक स्तरावर तेलाचा खेळी
कच्च्या तेलाचा दर 1.31 टक्क्यांनी वाढून 104.5 डॉलर प्रति बॅरलवर होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील तेल केंद्र खार्ग बेटावरील तेल केंद्रांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराण समर्थित बंडखोर संघटनांनी अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध युद्धात उडी घेण्याचा इशारा दिला आहे. जर त्यांनी बाब-अल-मंदेबच्या आखातात उडी घेतली तर ते तेलाचा दुसरा मार्ग बंद करू शकेल. येथून दररोज 6 दशलक्ष बॅरल कच्चे तेल प्रवास करतं.
डॉलरची स्थिती काय?
डॉलर निर्देशांक किंचित कमी होऊन १००.२० वर पोहोचला, परंतु गेल्या आठवड्याच्या १० महिन्यांच्या उच्चांकाच्या जवळ राहिला. युरो ०.१४ टक्क्यांनी वाढून $१.१४३३ वर पोहोचला, तर स्टर्लिंग ०.१७ टक्क्यांनी वाढून $१.३२४५ वर पोहोचला. येन १६० प्रति डॉलर पातळीच्या जवळ होता आणि शेवटचा १५९.४४ वर होता.
सोन्याच्या दरांवर किती परिणाम?
डॉलरच्या मंदीमुळे सत्राच्या सुरुवातीला १ टक्क्यांनी घसरल्यानंतर आज सोन्याचे भाव स्थिर राहिले. स्पॉट गोल्ड ५,०१७.५३ डॉलर प्रति औंसवर अपरिवर्तित राहिले, तर एप्रिल डिलिव्हरीसाठी अमेरिकन सोन्याचा वायदा ०.८ टक्क्यांनी घसरून ५,०२०.९० डॉलरवर आला. स्पॉट सिल्व्हर ०.४ टक्क्यांनी वाढून ८०.८८ डॉलर प्रति औंसवर पोहोचला.





