Sunday, February 22, 2026
Homeमहाराष्ट्ररविवारी घराबाहेर पडण्याआधी ही महत्त्वाची बातमी

रविवारी घराबाहेर पडण्याआधी ही महत्त्वाची बातमी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे तिन्ही मार्गावर रेल्वे रॅकच्या देखभाल आणि इतर संबंधित कामांसाठी मुंबईत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक कालावधीत रेल्वेची सेवा बंद राहणार आहेत. तर काही ठिकाणी विशेष रेल्वे सेवा सुरु ठेवण्यात येणार आहे.

माटुंगा ते मुलुंड मार्गावर सकाळी 11 am ते 3.55 pm वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 या वेळेत स्लो ट्रॅकवरून सुटणाऱ्या गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. पुढे मुलुंड स्थानकावर पुन्हा स्लो ट्रॅकवर वळवण्यात येतील आणि 15 मिनिटे उशिरानं निश्चित स्थानकात पोहोचतील.

मध्य रेल्वेच्या हार्बर रेल्वेवरील पनवेल – वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 am ते दुपारी 4.05 pmवाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल – बेलापूर येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल – बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. पनवेल येथून ठाण्याकरीता सुटणाऱ्या अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून ठाणेकरीता सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी – नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर सेवा उपलब्ध असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -