शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ईडीने या वृत्ताला अद्याप दुजोरा दिला नाही. मात्र, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती दिली आहे. शिंदे गटाच्या नेत्याच्याच भावाला ईडीने ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. सदानंद कदम यांना मुंबईला आणण्यात येणार असून त्यांची मुंबईतच कसून चौकशी केली जाणार असल्याचं वृत्त आहे. या घटनेनंतर रामदास कदम काय प्रतिक्रिया व्यक्त करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सर्वात मोठी बातमी ! शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -