Tuesday, July 29, 2025
Homeक्रीडामुंबईची खास झलक दिसणार जर्सीमध्ये, खास आहे यंदाची मुंबई इंडियन्स संघाची किट

मुंबईची खास झलक दिसणार जर्सीमध्ये, खास आहे यंदाची मुंबई इंडियन्स संघाची किट

आगामी इंडियन प्रिमीयर लीगसाठी सर्व संघ सज्ज होत असून सर्वात यशस्वी आयपीएल संघ मुंबई इंडियन्सने देखील आज इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी (2023) हंगामासाठी त्यांच्या अधिकृत जर्सीचे अनावरण केले. शंतनू आणि निखिल या डिझायनर जोडीने तयार केलेली ही जर्सी अधिक खास आहे. कारण निळ्या आणि सोनेरी रंगांमध्ये बनलेल्या या जर्सीमध्ये खास मुंबईची झलक असणार अशी माहिती समोर येत आहे. मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात जर्सीची झलक दिसत आहे. यामध्ये जर्सीवर मुंबईतील काही प्रसिद्ध ठिकाणं जसंकी गेट वे ऑफ इंडिया तसंच रस्त्यांची झलक आणि टॅक्सी अशा गोष्टी दिसून येत आहेत. दरम्यान ही जर्सी 10 मार्चपासून केवळ MI शॉपवर लाँच झाली असून पहिले 7 दिवस विक्रीसाठी उपलब्ध असेल. त्यानंतर इतरही प्लॅटफॉर्मवर ही जर्सी उपलब्ध असेल.

यंदाच्या जर्सीमध्ये विशेष एक कस्टमायझेशन ऑपश्न फॅन्ससाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्यामुळे फॅन्सना त्यांच्याा नावांसह आणि त्यांच्या पसंतीच्या नंबरसह जर्सी पर्सनलाईस करता येऊ शकते. MI शॉपवर मॅच जर्सी, ट्रेनिंग जर्सी आणि ट्रॅव्हल जर्सी तसंच इतर मर्चनडाईसही उपलब्ध आहेत. दरम्यान या जर्सी अनावरणप्रसंगी बोलताना, मुंबई इंडियन्सचे प्रवक्ते म्हणाले, “आमच्या संघाची जर्सी ही मुंबई इंडियन्सच्या लोकभावनेचे प्रतिबिंब आहे.” वानखडे स्टेडियमवरील घरगुती खेळांसाठी तिकीट विक्री देखील पूर्व नोंदणीद्वारे आणि MI सदस्यांसाठी सुरू झाली आहे. चाहत्यांसाठी तिकिटे 14 मार्च 2023 रोजी उघडतील. मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 8 एप्रिल 2023 रोजी त्यांचा पहिला होम गेम खेळेल, चाहते bookmyshow.com

वर तिकिटे बुक करू शकतात.

मुंबई इंडियन्सचं वेळापत्रक
दोन एप्रिल  vs आरसीबी – अवे
आठ एप्रिल  vs चेन्नई – होम
11 एप्रिल  vs दिल्ली – अवे
16 एप्रिल vs कोलकाता – होम
18 एप्रिल vs हैदराबाद – अवे
22 एप्रिल vs पंजाब – होम
25 एप्रिल vs गुजरात – अवे
30 एप्रिल vs राजस्थान – होम
3 मे vs पंजाब – अवे
6 मे vs चेन्नई – अवे
9 मे vs आरसीबी – होम
12 मे vs गुजरात – होम
16 मे vs लखनौ – अवे
21 मे vs हैदराबाद – होम

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -