Friday, January 23, 2026
Homeकोल्हापूरदीड वर्षाच्या लेकरासह आईची रंकाळ्यात उडी, कौटुंबिक वादातून आत्महत्या

दीड वर्षाच्या लेकरासह आईची रंकाळ्यात उडी, कौटुंबिक वादातून आत्महत्या

पती-पत्नीच्या वादातून एका विवाहितेने आपल्या दीड वर्षाच्या मुलासह रंकाळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आज घडला. रुकसार अनिस निशाणदार (वय २६) आणि उमर अनिस निशाणदार (वय दीड वर्षे दोघेही मूळ रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले, सध्या रा. रंकाळा टॉवर परिसर, कोल्हापूर) असे मृतांचे नाव आहे. सोमवारी (दि. १३) दुपारी ही घटना घडल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी रात्री साडेआठच्या सुमारास दोघांचे मृतदेह रंकाळ्यातून बाहेर काढले.

दरम्यान, पती अनिस अन्वर निशाणदार आणि सासू सायराबानू अन्वर निशाणदार या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी माहेरच्या नातेवाईकांनी केली. तर सासरचे काही नातेवाईक मृतदेह स्वीकारण्यासाठी सीपीआरमध्ये आल्याने दोन्ही गटात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -