बाॅलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. विशेष म्हणजे मलायका अरोरा ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी मलायका कायमच सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करते. मलायका अरोरा हिच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांचे प्रचंड प्रेम देखील मिळते.
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा ही अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे. अनेकदा हे दोघेसोबत स्पाॅट देखील होतात.आता मलायका अरोरा हिचे नाव एका गायकासोबत जोडले जात आहे. या गायकासोबतची जवळीकता मलायका अरोरा हिची वाढली असल्याने अर्जुन कपूर याचा पत्ता कट झाल्याच्या चर्चा आहेत.
गुरु रंधावा याच्यासोबत मलायका अरोरा हिचे नाव जोडले जात आहे. गुरु रंधावा आणि मलायका अरोरा यांचे तेरा की ख्याल हे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.मलायका अरोरा हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत गाण्याची झलक चाहत्याना दाखवली आहे. या पोस्टरमध्ये गुरु रंधावा आणि मलायका अरोरा दिसत आहे. मलायका हिचा बोल्ड लूक दिसत आहे.
गुरु रंधावा आणि मलायका अरोरा यांचे हे गाणे 4 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे चाहत्याने मलायका अरोरा आणि गुरु रंधावा यांची जोडीही आवडली आहे. मात्र, अर्जुन कपूर याचा पत्ता कट झाल्याचे बोलले जातंय.