Saturday, September 20, 2025
Homeमनोरंजन‘तारक मेहता…’ शोमध्ये पुन्हा का नाही परतली दयाबेन? खरं कारण अखेर समोर

‘तारक मेहता…’ शोमध्ये पुन्हा का नाही परतली दयाबेन? खरं कारण अखेर समोर

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. तर दुसरीकडे चाहते दयाबेन मालिक पुन्हा कधी येणार याच प्रतिक्षेत आहे. अभिनेत्री दिशा वकानी हिने मालिकेत दयाबेन या भूमिकेला योग्य न्याय दिला. मालिकेत दिशा वकानी हिची असलेली जागा अद्याप कोणतीच अभिनेत्री घेऊ शकलेली नाही. गेल्या सात वर्षांपासून दिशा वकानी हिने ब्रेक घेतला आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत दिशा वकानी हिचा भाऊ मयूर वकानी याने दयाबेन यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय अभिनेत्री मालिकेत पुन्हा येणार नाही… हे देखील स्पष्ट केलं आहे.

 

तारक मेहता…’ मालिकेत पुन्हा का येणार नाही दिशा वकानी?

नुकताच झालेल्या मुलाखतीत मयूर वकानी उर्फ सुंदर म्हणाला, ‘मी दिशा वकानी हिचा प्रवास फार जवळून पाहिला आहे. कारण मी तिच्यापेक्षा 2 वर्ष मोठा आहे. जेव्हा तुम्ही प्रामाणिक आणि विश्वासाने काम करता, तेव्हा देवाचे आशीर्वाद देखील तुमच्या सोबत असतात. ती प्रचंड मेहनती आहे. कारण लोकांनी तिच्या दयाबेन भूमिकेला भरभरुन प्रेम दिलं…’

 

मयूर पुढे म्हणाला, ‘माझ्या वडिलांनी मला कायम योग्य मार्गावर चालण्यास सांगितलं. आयुष्यात आपण कलाकार आहोत. आपल्याला जी भूमिका मिळेल ती पूर्ण प्रामाणिकपणे निभावली पाहिजे. आज सुद्धा आम्ही त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालतो. दिशा खऱ्या आयुष्यात एक आई आहे आणि ती आईची भूमिका योग्य रित्या पार पाडत आहे… मला माझ्या बहिणीवर विश्वास आहे की, ती भूमिका योग्य प्रकारे पार पाडत आहे…’

 

दिशा वकानी मालिकेत दयाबेन ही भूमिका साकारत होती. 2018 मध्ये मध्ये प्रसूती रजेवर गेली आणि तेव्हापासून ती मालिकेमध्ये परतली नाही. काही महिन्यांपूर्वी असित मोदी यांनी कंफर्म केलं होतं की, दिशा पुन्हा मालिकेत पदार्पण करणार नाही…

 

असित मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आता दिशा वकानी हिचं पुन्हा मालिकेत पदार्पण करणं कठीण आहे. लग्नानंतर महिलांचं आयुष्य पूर्णपणे बदलतं… छोट्या मुलांचा आणि घराचा सांभाळ करणं खरंच कठीण आहे… पण मी अजूनही सकारात्मक आहे. मला वाटतं की देव चमत्कार करेल आणि ती परत येईल. जर ती परत आली तर ती मालिकेसाठी चांगली गोष्ट असेल.’

 

मालिकेने पूर्ण केले 4500 एपिसोड

गेल्या 17 वर्षांपासून मालिका चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. नुकताच मालिकेने 4 हजार 500 एपिसोड पूर्ण केले… या मालिकेने टीआरपी चार्टवर आपलं स्थान सातत्यानं राखलं आहे. तारक मेहतामधून दयाबेन गायब असली तरी, असित मोदींच्या मालिकेने बदलत्या काळाशी एका नवीन दृष्टिकोनातून जुळवून घेण्यात यश मिळवले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -