व्यवसायाच्या दृष्टीने चालू आठवडा खूपच लहान आहे. कारण आज म्हणजे शुक्रवारी सुट्टी आहे. डॉ भीमराव आंबेडकर जयंतीनिमित्त आज बाजारपेठा बंद राहणार आहेत. आता सोमवारी बाजार सुरू होईल.
BSE वर उपलब्ध माहितीनुसार, 14 एप्रिल रोजी शेअर बाजार, कमोडिटी मार्केट आणि चलन बाजार बंद राहतील. गेल्या आठवड्यातही फक्त 3 दिवस ट्रेडिंग झाले होते. कारण महावीर जयंती आणि गुड फ्रायडेनिमित्त बाजारपेठेत सुट्टी होती.
बाजारातील व्यवहारासाठी काल व्यापारी आठवड्याचा शेवटचा दिवस होता. आता थेट 17 एप्रिल रोजी बाजारपेठा उघडतील. कारण डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असणार आहे. त्यानंतर शनिवार आणि रविवारी वीकेंड असेल.