Wednesday, December 18, 2024
Homeबिजनेसदोन आयपीओच्या लिस्टिंगनं स्टॉक मार्केटमध्ये तुफान, सेन्सेक्स कोसळत असताना गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट

दोन आयपीओच्या लिस्टिंगनं स्टॉक मार्केटमध्ये तुफान, सेन्सेक्स कोसळत असताना गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट

Jungle Camps IPO आणि Toss The Coin IPO चे आयपीओ आज शेअर बाजारात लिस्ट झाले. हे दोन्ही आयपीओ एसएमई क्षेत्रातील होते. दोन्ही आयपीओनं गुंतवणूकदारांना 90 टक्के परतावा लिस्टिंगला दिला.

 

टॉस द कॉइनचा शेअर 363.05 रुपयांवर ट्रेड करताना पाहायला मिाला. जंगल कॅम्प्सचा शेअर 129.96रुपयांवर पोहोचला. लिस्ट झाल्यानंतर हा शेअर 143.50 रुपयांपर्यंत पोहोचला होता.

 

Jungle Camps India IPO चा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी 10 डिसेंबरला खुला झाला होता. हा आयपीओ दुसऱ्या दिवसापर्यंत 138.67 पट सबस्क्राइब झाला होता. रिटेल गुंतवणूकदारंनी 232.74 पट, गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 104.34 पट सबस्क्राइब केलं होतं. कंपनीच्या महसुलात 2024 मध्ये वाढपाहायला मिळाली होती. कंपनीचं बाजारमूल्य 111.59 कोटी आहे.

 

Toss The Coin IPO कंपनीचा आयपीओ 1000 पट सबस्क्राइब झाला होता. या कंपनीनं नव्यानं 504000 शेअर जारी केले होते. या आयपीओचा किंमतपट्टा 172-18 इतका होता. आज हा बाजार बंद झाला तेव्हा शेअर 363.05 रुपयांवर होता.

 

टॉस द कॉइन आयपीओच्या गुंतवणूकदारांना 100 टक्के नफा झाला आहे. या आयपीओच्या एका लॉटमध्ये 600 शेअर होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -